Silver vs Gold : भारतीय संस्कृतीत सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दागिन्यांपासून ते सुरक्षित गुंतवणुकीपर्यंत या दोन्ही धातूंकडे पाहिले जाते. मात्र, जेव्हा किमतीचा विचार येतो, तेव्हा सोने आणि चांदीमध्ये मोठी दरी दिसून येते. सोन्याच्या तुलनेत चांदी कमालीची स्वस्त का असते? जागतिक बाजारपेठेत या दोन धातूंच्या किमती कशा ठरतात? याचा हा विशेष धांडोळा.
१. बाजारपेठेचा आकारसोन्याच्या तुलनेत चांदीच्या बाजारपेठेचा आकार अत्यंत छोटा आहे. एका अंदाजानुसार, चांदीचा बाजार सोन्याच्या तुलनेत केवळ १० टक्के आहे. गुंतवणुकीसाठी आणि ट्रेडिंगसाठी सोन्याला जागतिक स्तरावर प्रथम पसंती दिली जाते. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्यामुळे अनिश्चित काळात सोन्याची मागणी वाढते आणि पर्यायाने किमतीही उंचावलेल्या राहतात.
२. उत्खनन आणि उपलब्धतासोन्यापेक्षा चांदी निसर्गात अधिक प्रमाणात उपलब्ध आहे, हे त्याच्या स्वस्त असण्याचे मुख्य कारण आहे. सोन्याचे उत्खनन अत्यंत कठीण आणि खर्चिक प्रक्रिया आहे; कारण सोने जमिनीच्या खोल थरातून विशिष्ट तंत्रज्ञानाने काढावे लागते. याउलट, तांबे, जस्त किंवा शिसे यांसारख्या धातूंच्या खाणींमध्ये 'बाय-प्रोडक्ट' म्हणून चांदी सहज उपलब्ध होते. उत्पादनाचा खर्च कमी असल्याने चांदीची किंमत सोन्याच्या तुलनेत कमी राहते.
३. औद्योगिक मागणीचा प्रभावचांदीचा वापर दागिन्यांपेक्षा उद्योगांमध्ये (उदा. इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा) जास्त होतो. त्यामुळे चांदीची मागणी थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. जेव्हा आर्थिक मंदीची चिन्हे दिसतात, तेव्हा औद्योगिक उत्पादन घटते आणि चांदीच्या किमती खाली येतात. सोने मात्र केवळ आर्थिक स्थितीवर नव्हे, तर 'चलन' म्हणूनही आपला दर्जा टिकवून ठेवते.
४. मध्यवर्ती बँकांची पसंतीजगभरातील मध्यवर्ती बँका (उदा. आरबीआय, फेडरल रिझर्व्ह) आपल्या गंगाजळीत सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणावर ठेवतात. सोन्याचा साठा हा देशाच्या आर्थिक मजबुतीचा आधार मानला जातो. याउलट, मध्यवर्ती बँकांच्या अधिकृत साठ्यात चांदीला आता फारसे स्थान मिळत नाही. बँकांकडून होणारी सोन्याची सततची खरेदी त्याचे भाव चढे ठेवण्यास मदत करते.
वाचा - आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये धुमधडाका; बाजारात 'बुल्स'चे पुनरागमन, पण 'रुपया'ने वाढवली चिंता
५. टॅक्स आणि सरकारी धोरणेसरकारने सोन्या-चांदीवर लावलेले आयात शुल्क आणि जीएसटी यामुळेही किमतीत चढ-उतार होतात. तसेच मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला की, गुंतवणूकदारांच्या मानसिकतेनुसार या धातूंचे दर बदलतात. जरी गेल्या काही दिवसांत चांदीमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली असली, तरी सोन्याच्या तुलनेत ती आजही 'सामान्यांचा धातू' म्हणून ओळखली जाते.
Web Summary : Gold's higher price stems from smaller market size, difficult extraction, central bank preference, and its role as a safe haven. Silver, abundant and used industrially, is cheaper due to higher availability and fluctuating demand, making it accessible.
Web Summary : सोने की उच्च कीमत छोटे बाजार आकार, मुश्किल निष्कर्षण, केंद्रीय बैंक की पसंद और एक सुरक्षित ठिकाने के रूप में इसकी भूमिका से उपजी है। चांदी, प्रचुर मात्रा में और औद्योगिक रूप से उपयोग की जाती है, उच्च उपलब्धता और अस्थिर मांग के कारण सस्ती है, जिससे यह सुलभ हो जाती है।